गणेशोत्सवाच्या शुभेच्छा हटवल्याने तणाव!

    09-Sep-2024
Total Views |

Ganesh Chaturthi
कोटा : कट्टरपंथी मुख्यध्यापकाने एका शाळेच्या सोशल मीडियावरील व्हॅट्सअॅप ग्रुपवर गणेश चतुर्थीच्य़ा शुभेच्छा दिल्या आणि तो संदेश पुन्हा हटवला. यामुळे राजस्थान येथील कोटा जिल्ह्यात तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी हिंदू शिक्षकांनी आणि पालकांनी मुख्यध्यापकाने केलेल्या कृतीविरोधात जाहीर निषेध केला. यावेळी उपस्थितांनी जाहीर निदर्शन केले. तसेच याप्रकरणात मुख्यध्यापकाला अटक करण्यात आले होते. ही घटना ७ सप्टेंबर रोजी शुक्रवारी घडली होती.
 
शाळेच्या मुख्यध्य़ापकाचे नाव हे मोहम्मद शफीक असे होते. यावेळी मुख्यध्यापकाच्या कृत्याने सामाजिक सलोखा बिघडल्याने हा धक्कादायक प्रकार घडला होता. यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती अशी माहिती पोलिसांनी दिली होती. हे प्रकरण कोटा जिल्ह्यातील लातुरी येथील आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी शफीकने दोन तासांसाठी गणेश चतुर्थीचा संदेश सोशल मीडिया ग्रुपवरून हटवला. ज्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.
 
शुक्रवारी सार्वजनिक गणेशोत्सव सणास सुरूवात झाली. यामुळे देशात आनंदाचे वातावरण होते. यावेळी अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी संबंधित ग्रुपवर गणेश चतुर्थींच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी मुख्यध्यापकाने सुरूवातीला ग्रुपवर शुभेच्छा दिल्या. मात्र त्यानंतर शुभेच्छा दिलेला संदेश मुख्यध्यापकाने हटवल्याने यावेळी घटनास्थळी काही गावकरी आणि हिंदू संघटनांनी शाळेच्या बाहेर निदर्शन केले.
 
या घटनेमुळे वातावरण तापले असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ पोहोचून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सैन्यांचा फोजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी काही व्हॅट्सअॅप ग्रपवरील असणाऱ्या सदस्यांनी तसेच गावकऱ्यांनी आरोपी मुख्याध्यापक शफीक विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. 
 
या घडलेल्या प्रकरणावरून आता पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना पोलीसांनी सांगितले की, प्राचार्य हे कट्टरपंथी समुदायाचे होते. त्यांनी शुक्रवारी गणेश जयंती निमित्त शुभेच्छा दिल्याच्या काही पोस्ट सोशल मीडियाच्या ग्रुपवर प्रसारित करण्यात आला होता. मात्र त्यानंतर त्या पोस्ट हटवल्याने हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या. या कृत्याने समाजातील सलोखा बिघडवण्याचे काम केल्याच्या आरोपाखाली भारतीय न्यायसंहिता कलम १९६ अंतर्गत गुन्हा दाखल करत मुख्यध्यापक शफीक यांना अटक कऱण्यात आल्याचे सांगितले.