भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार, संदीप घोष यांच्यावरील आरोपसत्र थांबेना !

08 Sep 2024 14:45:46

ghhosh
 
 
 
कोलकाता : आर.जी. कार रुगणालयातील माजी प्रचार्य संदीप घोष यांना अटक झाल्यापासून, त्यांच्या मागील आरोपसत्र थांबायचं नाव घेत नाहीये. सीबीआयच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. आपल्या कार्यकाळात, घोष आणि त्यांच्या साथीदारांनी विविध घोटाळे करत कसे पैसे कमवले, या बाबतची माहिती समोर येत आहे.
विद्यार्थ्यांच्या निकालात फेरफार करणे, मनमर्जीने उमेदवारांची नियुक्ती करणे, अशा अनेक घटना आता तपासात समोर येत आहेत.
आर.जी. कार मधील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांना हाऊस स्टाफ निवडीसाठी कोणतेही पॅनेल अस्तित्वात असल्याची माहिती नव्हती. सीबीआयने कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार घोष यांनी हाऊस स्टाफच्या नियुकतीसाठी ‘मुलाखत’ प्रणाली सुरू केली होती. ज्यामधून अनेक गुणवंत उमेदवारांना डावलण्यात आलं होतं. त्याच सोबत खोट्या मुलाखतींच्या जोरावर, उमेदवारांची नियुक्ती केली जात असे,आणि त्या बदल्यात घोष यांच्या साथीदारांकडे पैसे पोहचवले जात.
तपासादरम्यान, सीबीआयला आढळलेला भ्रष्टाचार आणखी खोलवर रुजलेला होता. रुग्णालयातील उपकरणांसाठी काढली जाणारी निविदा, घोष यांचेच साथीदार बिप्लव सिंघा यांच्या "माँ तारा ट्रेडर्स"ला मिळावी यासाठी तजवीज केली गेली होती.
सीबीआयच्या तपासात अजून काही कंपन्यांची नावं समोर आली आहेत. सिंघा यांनी आपल्या कुटुंबासहीत, काही कंपन्या सुरू केल्या आणि निविदा प्रक्रीयेत सहभाग नोंदवला.
त्याच बरोबर, आरोपी सुरक्षारक्षक अफसर अली याच्या पत्नीला हॉस्पिटलच्या कॅन्टीनचं कंत्राट कसं मिळालं याबद्द्लची चौकशी केली जात आहे. घोष यांच्यावर त्यांनी पूर्वनिश्चित पद्धतीने कॅन्टीनचे कंत्राट दिल्याचा आरोप आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0