कॉफी टेबल बुक म्हणजे भांडवली बाजारांमध्ये क्रांती घडविणाऱ्या एनएसईच्या भूमिकेचे प्रतिबिंब : राज्यपाल राधाकृष्णन

08 Sep 2024 21:12:52
nse coffee table book launched
 

मुंबई :       राष्ट्रीय शेअर बाजारा(एनएसई)च्या प्रतिष्ठित पुतळा आणि कॉफी टेबल बुक याचे लाँचिंग राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले. दि. ०६ सप्टेंबर रोजी झालेल्या उद्घाटन सोहळ्यात एनएसई एमडी आणि सीईओ आशिषकुमार चौहान यांच्या उपस्थितीत मुख्यालयात "द जर्नी ऑफ एम्पॉवरिंग १.४ बिलियन ड्रीम्स" नावाचे कॉफी टेबल बुक" राज्यपालांच्या हस्ते लाँच करण्यात आले आहे.

दरम्यान, भारताच्या गुंतवणुकीच्या लँडस्केपची सर्वसमावेशकता आणि एकता आणि राष्ट्राचे सामूहिक प्रयत्न, आर्थिक प्रगतीच्या समान ध्येयासाठी एकत्र काम करणे या सर्वांचे प्रतिबिंब "द जर्नी ऑफ एम्पॉवरिंग 1.4 बिलियन ड्रीम्स"मध्ये दिसून येते. तसेच, एनएसईचे व्यवहार ही कामगिरी भारताच्या जागतिक दर्जाच्या संस्था तयार करण्याच्या आणि टिकवून ठेवण्याच्या क्षमतेचा पुरावा आहे.

एनएसईच्या बुल पुतळा आणि कॉफी टेबल याचे उद्घाट माझ्या हस्ते झाले याचा मला आनंद आहे. कॉफी टेबल बुक देशाच्या भांडवली बाजारांमध्ये क्रांती घडविणाऱ्या एनएसईच्या भूमिकेचे प्रतिबिंब आहे. देशाच्या वाढीसाठी योगदान. आर्थिक सामर्थ्य आणि ऊर्ध्वगामी गतीचे प्रतीक असलेला बुल पुतळा शेअर बाजाराच्या इतिहासातील खोल मुळे आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.





Powered By Sangraha 9.0