पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात सामूहिक अथर्वशीर्ष पठण; इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डकडून दखल

08 Sep 2024 15:31:16



dagdusheth-halwai-ganpati-mandir-pune-ganesh-chaturthi


मुंबई : 
    राज्यभरात गणेशोत्सवानिमित्त धामधुमीचे वातावरण पाहायला मिळत असून पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ॠषीपंचमीनिमित्त अथर्वशीर्ष पठण करण्यात आले आहे. गणेश चतुर्थीनिमित्त गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंदिरात ३५ हजार महिलांकडून अथर्वशीर्ष पठण करण्यात आले आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणरायाच्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला.


दरम्यान, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ऋषीपंचमी निमित्ताने सामुदायिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ऋषीपंचमी दिनी गणरायांसमोर माता भगिनींचे सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, शंखनाद, प्राणायाम व गणेशाची महाआरती संपन्न झाली. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व कवयित्री डॉ. अरुणाताई ढेरे यादेखील उपस्थित होत्या.

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने उत्सवाच्या १३२ व्या वर्षी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महिला अथर्वशीर्ष पठण उपक्रमाची दखल इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डने घेत डॉ. दीपक हरके यांनी ट्रस्टला प्रमाणपत्र दिले.



Powered By Sangraha 9.0