लाडकी बहीण योजनेचा १.६० कोटी महिलांना फायदा! 'या' तारखेपर्यंत भरा अर्ज

06 Sep 2024 11:37:34

Ladki Bahin
 
 
मुंबई : लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत १ कोटी ५९ लाख महिलांना फायदा झाला आहे. या १ कोटी ५९ लाख भगिनींना ४७८७ कोटींचे वाटप झाल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली आहे. तसेच येत्या ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु राहणार असल्याची माहितीही या बैठकीत देण्यात आली.
 
हे वाचलंत का? -  आनंदवार्ता! एकट्या महाराष्ट्रात तब्बल 'इतके' टक्के परकीय गुंतवणूक
 
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आजपर्यंत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात १ कोटी ५९ लाख भगिनींना ४७८७ कोटींचा लाभ देण्यात आला आहे. जुलै आणि ऑगस्ट अशी एकत्रित ३ हजार रुपयांची रक्कम डीबीटीद्धारे थेट महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. या योजनेत अडीच कोटी महिला लाभार्थींना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे अर्ज घेण्याची प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत चालू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0