झारखंड येथे दहशतवादी पथक तयार करण्याचा कट, दिल्ली पोलिसांचा खुलासा

06 Sep 2024 19:02:43
 
Al Qaeda Terrorist
 
रांची : झारखंड येथील डोंगराळ प्रदेशात अल कायदा (Al Qaeda Terrorist) इंडिया कॉन्टिनेंटच्या दहशदवाद्यांचे आत्मघाती पथक तयार करण्याचा कट रचण्यात आला होता. अल कायदा भारताच्या संशयित चार दहशतवाद्यांनी दिल्लीत परतल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने याबाबत खुलासा केला आहे. स्पेशल सेलने या दहशतवाद्यांना रांचीच्या चिन्हो येतील नाकता जंगलात नेले होते. तेथे दहशतवाद्यांच्या प्रस्तावित प्रशिक्षण शिबिराची व्हिडिओग्राफीही करण्यात आली. संबंधित ठिकाण हे वर्दळ झाडांनी वेढलेले असून निर्जन भाग आहे.
 
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने डॉ. इश्तियाकला रांचीतून आणि मोहम्मदला हजारीबागमधून अटक केली. फैझान व्यतिरिक्त इनामुल अन्सारी, शहबाज, मोतीइउर आणि अल्ताफ यांना २२ ऑगस्ट रोजी राजस्थानमधून अटक करण्यात आली. डॉ. इश्तियाकला देशात दहशत निर्माण करण्यासाठी आत्मघाती पथक तयार करायचे होते.
 
शस्त्रास्त्रांचा वापर करण्याबरोबर दहशतवाद्यांना नकता डोगराळ भागात आत्मघाती हल्ल्याचे प्रशिक्षण दिले गेले. शस्त्रास्र प्रशिक्षणादरम्यान होणारा आवाज फार दूर शकत नव्हता. यामुळेच दहशतवाद्यांनी प्रशिक्षण केंद्रासाठी ही जागा निवडली होती. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणात लक्ष दिल्यानंतर दजहशतवाद्यांनी संपूर्ण राज्यात दहशतवाद निर्माण करणारी संघटना उभारायची होती हे कबूल केले.
 
दरम्यान याप्रकरणाबाबत आणखी एक महत्त्वाची माहिती मिळाली आहे. डॉ. इश्तियाकने आपले दहशतवादी मॉड्यूल उत्तर प्रदेश आणि राजस्थानात पसरवले होते. इश्तियाकने बिहार येथील लखीसराय येथून शस्त्रे खरेदी केली होती. याप्रकरणात राजस्थानात छापे टाकण्यात आले. यावेळी एटीएसने या छाप्यात एके ४७ रायउफल, सहा जिंवत काडतुसे, ३८ बोअरचे रिव्हॉल्व्हर, ३२ बोअरची ३० जिवंत काडतुसे, ३० एके ४७ काडतुसे, डमी इन्सास, एअर रायफल, लोखंडी एल्बोल पाईप, तसेच बॉम्ब इत्यादी वस्तू जप्त केल्या.
 
 
Powered By Sangraha 9.0