मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले असता त्यांना काय मिळालं? असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. महायूती सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना साडेसहा हजार रुपयांची वेतनवाढ दिल्याने त्यांनी संप मागे घेतला आहे.
केशव उपाध्ये म्हणाले की, "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि शरद पवारांसारखे अनुभवी राजकारणी पाठीशी असताना महाविकास आघाडीचे सरकार असताना, एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांना काय मिळाले? अनेकांनी आत्महत्या केल्या होत्या, अनेकांची उपासमार झाली होती, कित्येक लोकांचे येण्याजाण्याचे हाल झाले होते."
हे वाचलंत का? - मालवण पुतळा दुर्घटनेप्रकरणी आरोपींना ६ दिवसांची पोलिस कोठडी!
"आज महायुती सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पाच हजारांच्या मागणी पेक्षा जास्त म्हणजे साडेसहा हजार रुपयांची वेतनवाढ दिली आहे. शिवाय एसटी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चासाठी सर्वांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेप्रमाणे संलग्न योजना करण्याचे आदेश दिले आहेत," असे ते म्हणाले.