सिंधुदूर्ग : मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आरोपींना ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिल्पकार जयदीप आपटे आणि केतन पाटील यांना ही शिक्षा सुनावण्यात आली असून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना घडल्यानंतर आरोपी शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार चेतन पाटील फरार झाले होते. त्यानंतर चेतन पाटीलला अटक करण्यात आली. मात्र, जयदीप आपटे हा अनेक दिवसांपासून फरार होता.
हे वाचलंत का? - "मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीतील गल्लोगल्ली..."; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
दरम्यान, बुधवारी रात्री पोलिसांनी जयदीप आपटेला कल्याणमधून अटक केली. गुरुवारी या दोन्ही आरोपींना मालवण न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्या दोघांनाही ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून येत्या १० सप्टेंबरपर्यंत ते पोलिस कोठडीत राहणार आहेत.