बंगळूरू : मोहम्मद दानिश या कट्टरपंथी तरूणाने हिंदू मुलीला जबरदस्ती धर्मांतरण (Conversion) करण्यास दबाव आणला गेला. हे प्रकरण कर्नाटकातील उड्डपी जिल्ह्यातील आहे. याप्रकरणाची माहिती एका विद्यार्थीनीने दिली होती त्यानंतर आरोपी दानिश खानला अटक करण्य़ात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दानिश खान एका नामांकित विद्यापीठातून पदवीत्युत्तर शिक्षण घेत असताना त्याची एका वर्गमैत्रणीशी मैत्री झाली होती. त्यानंतर त्यांनी लवकरच एकमेकांना डेट करू लागले आणि एकमेकांना ओळखल्यानंतर ते प्रेमात पडले.
याप्रकरणात आता पीडित महिलेने घडलेल्या घटनेविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणातील तक्रारीत लिहिले की, २२ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील आयोध्येतील राम मंदिराच्या उद्धघाटना वेळी दानिश खानने राम मंदिर आणि हिंदू धर्मांबाबत अवमानास्पद वक्तव्य केले. या तक्रारीत आणखी एका भागात नमूद केले आहे की, ११ मार्च रोजी तो महिलेच्या खोलीत घुसून तिसला अनेकदा लग्नासाठी मागणी घातली होती. आणि तिला धर्मांतरण करण्यासाठी स्वीकारण्यास भाग पाडू लागला.
मात्र यावेळी महिलेने कट्टररपंथी मित्राला प्रतिरोध केला. पीडितेने पुढे तक्रारीत म्हटले की. कट्टरपंथी दानिश खानने तिला अनेकदा चुकीचा स्पर्श केला होता. तिच्यासोबत शारिरीक जवळीकता साधण्याचा प्रयत्न केला जात होता. यावेळी हिंदू मुलीने सांगितले की तिने वारंवार प्रतिकार केला विरोध केला असता आरोपीने हिंदू मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श केल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला.
महिलेले पुढे तक्रारीत म्हटले आहे की, या घटनेनंतर दानिश खानने फोनद्वारे संपर्क साधत तिला छळण्याचा प्रयत्न केला होता. पीडितेने सततच्या त्रासाला कंटाळून ३१ ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. महिलेल्या तक्रारीनंतर अखेर पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यात यश मिळाले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. दानिश खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे असे पोलिसांनी सांगितले आहे.