'अंधेरीचा राजा'चे दर्शन घ्यायला जाताय? आधी हे वाचा!

05 Sep 2024 16:05:10

Andhericha Raja

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Andhericha Raja Dresscode)
राज्यात सध्या सर्वत्र गणेशोत्सवाच्या तयारीची धुमधाम पहायला मिळत आहे. अशातच अंधेरी येथील आझाद नगर सार्वजनिक उत्सव मंडळाने (अंधेरीचा राजा) दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरीता दरवर्षीप्रमाणे यंदाही ड्रेसकोड लागू केला आहे. भाविकांना पूर्ण कपडे घालूनच बाप्पाच्या दर्शनासाठी जाता येणार असून हाफ कपडे किंवा शॉर्ट कपडे घालून येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे.

यंदा हे मंडळ ५९ वे गणेशोत्सव वर्ष साजरा करत आहे. या मंडळाने यावर्षी राजस्थानमधील 'पाटवा की हवेली'चा देखावा तयार केला आहे. आपल्या भव्यदिव्य देखाव्यामुळे आणि वेगळेपणानमुळे हे मंडळ कायम चर्चेत असते. मात्र आता ड्रेसकोड संदर्भात लागू केलेल्या नियमामुळे हे मंडळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गेल्या पंधरा वर्षापूर्वी हा नियम लागू केला असून दरवर्षी तो नियमित पाळला जात असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. हाफ कपडे किंवा शॉर्ट कपडे घालून येणाऱ्या महिला व पुरुषांकरीता लुंगी आणि फुल पँटची व्यवस्था करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0