'स्टार हेल्थ इन्शुरन्स'तर्फे नेत्रहीनांना नवे बळ; भारतात पहिल्यांदाच ब्रेलमध्ये विमा योजना!

04 Sep 2024 17:04:44
star health insurance policy launched


मुंबई :   
   स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड(स्टार हेल्थ इन्शुरन्स) या भारतातील सर्वात मोठ्या रिटेल विमा कंपनीने पहिलीच ब्रेल लिपीतील विमा योजना लाँच केली आहे. या योजनेच्या मार्फत सर्वसमावेशक आणि सर्वांसाठी विमा योजना उपलब्ध करून देण्याची स्टार हेल्थची बांधिलकी दिसून येते. स्टार हेल्थने वैविध्यपूर्ण आणि आर्थिक सर्वसमावेशकता मोहीम आखत भारतातील ३४ दशलक्ष अंध व्यक्तींना उत्पन्नाच्या संधी देण्याचे ठरविले आहे. या योजनेच्या लाँच कार्यक्रमावेळी स्टार हेल्थ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक तथा सीईओ आनंद रॉय, बोलंट उद्योगाचे सह- संस्थापक श्रीकांत बोल्ला आदी उपस्थित होते.

दरम्यान, देशातील नेत्रहीन समाजाला योग्य माहिती मिळवून देत आरोग्य व विम्याशी संबंधित स्वतंत्रपणे निर्णय घेण्यास सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. स्टार हेल्थ समाजातील वंचित, दुर्लक्षित वर्गाला प्रशिक्षण आणि कौशल्य शिक्षण देऊन त्यांना आरोग्य विमा प्रतिनिधी बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. आम्हाला ब्रेलमध्ये ‘स्पेशल केयर गोल्ड’ ही योजना लाँच करताना आनंद होत आहे. हा समाजाच्या सर्व क्षेत्रांतील व्यक्तींना आरोग्य विमा घेण्याची समान संधी मिळावी या मिशनमधला महत्त्वाचा टप्पा आहे, असे स्टार हेल्थ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक तथा सीईओ आनंद रॉय यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, सर्वांना सामावणारा विमा उद्योग तयार करण्यासाठी विशेषतः भारतातील ३४ दशलक्ष अंध व्यक्तींचा समावेश करण्यासाठी बांधील आहोत, असेही सीईओ रॉय म्हणाले. तर दिव्यांग या नात्याने विविध आव्हानांचा सामना करणारी व्यक्ती या नात्याने मी स्टार हेल्थ इन्शुरन्सचे त्यांनी लाँच केलेल्या या पहिल्या आणि सर्वसमावेशक विमा योजनेबद्दल अभिनंदन करतो, असे बोलंट उद्योगाचे सह- संस्थापक श्रीकांत बोल्ला म्हणाले. मी व माझे कुटुंबीय स्टार हेल्थ इन्शुरन्सचे ग्राहक असून आता मी स्टार हेल्थचा नोंदणीकृत आरोग्य विमा प्रतिनिधी आहे असे सांगताना आता स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी उत्सुक व मदतीच्या शोधात असलेल्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन, असेही बोल्ला यावेळी म्हणाले.





Powered By Sangraha 9.0