ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन

04 Sep 2024 15:24:51
eassay writing competition


मुंबई :     
  ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट(IMDPCT)च्या अंतर्गत पहिल्या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्व शाळा आणि महाविद्यालयातील कार्यरत शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले आहे. या निबंध स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना 'शिक्षक आणि स्वप्ने' अशी असणार आहे. या स्पर्धेत परीक्षकांनी शिफारस केलेल्या आणि इतर लक्षणीय नोंदी निबंधांच्या अमूल्य संग्रहाच्या स्वरूपात ट्रस्टद्वारे पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाणार आहेत.

दरम्यान, परीक्षकांमध्ये ट्रस्टच्या बाहेरील तीन सदस्य शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ असतील. १८ पेपर्स असतील जे कॉन्फरन्ससाठी निवडले जातील त्यांना कार्यक्रमप्रसंगी रोख रक्कमेचे पारितोषिक दिले जाईल. तेच १८ लेखक रोख पारितोषिकांसाठी पात्र असतील. या स्पर्धेत एकूण १८ रोख बक्षिसे असून कार्यक्रमात सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले जाईल.

या निबंध स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कृपया खालील Google फॉर्म भरून नोंदणी करा.
https://forms.gle/VjXkwZK49MwGHkJe8


सहभागी स्पर्धक खालील विषयांवर मराठी, हिंदी आणि इंग्रजी सारख्या कोणत्याही भाषांमध्ये निबंध लेखन करू शकतात:-

1. स्मार्टफोनसह विद्यार्थी
2. माझ्या शिक्षकांचा माझ्यावर कसा प्रभाव पडला?
3. शिक्षकाची खरी व्याख्या
4. मी माझ्या विद्यार्थ्यासाठी पाहिलेली स्वप्ने
5. शिक्षक म्हणून माझा पहिला दिवस
वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर आपण आपले लिखाण करू शकता.


स्वरूप/नियम:

1. पेपर/निबंध किमान 2000 शब्द आणि कमाल 3000 शब्दांचा असावा आणि 9594020888 / 9870990764 / 8652268639 वर 10.09.2024 पूर्वी ऑनलाइन सबमिट केला जावा.
2. एकाच शाळेतून कितीही शिक्षक सहभागी होऊ शकतात.
3. सहभागी कोणत्याही विद्याशाखा / विषयातील असू शकतो.
4. सहभागी वर नमूद केलेल्या विषयांपैकी कोणताही एक विषय निवडू शकतात
5. सबमिशनचे स्वरूप -
कव्हरिंग पेज (विषय, नाव आणि शाळेचा पत्ता आणि नावासह शिक्षकाचा संपर्क क्रमांक), निबंध, संदर्भग्रंथ मूल्यमापन जर असेल तर.
निबंध पीडीएफ स्वरूपात सादर करावा.
अधिक तपशिलांसाठी, तुम्ही तुमच्या समस्या 9594020888 / 9870990764 / 8652268639 या क्रमांकावर सांगू शकता. 


Powered By Sangraha 9.0