भारताच्या सेवा क्षेत्रातील वाढ पाच महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर

04 Sep 2024 18:58:42
bharat public service sector growth


नवी दिल्ली :      देशातील सेवा क्षेत्रातील वाढ उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. सेवाक्षेत्रातील सक्रियता ऑगस्ट महिन्यात पाच महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर असून मार्चपासून सर्वाधिक विस्तार दर दर्शविला आहे. देशातील सेवाक्षेत्राचा विस्तार दीर्घकालीन सरासरीपेक्षा जास्त असून उच्चांक पातळीवर दिसून येत आहे.

एका व्यावसायिक सर्वेक्षणानुसार, क्रियाशीलतेमध्ये वेगवान वाढ आणि उच्च व्यवसाय वाढ यामुळे भारताच्या सेवा क्षेत्राची वाढ ऑगस्टमध्ये पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. जुलैमध्ये ६०.३ वरून वाढत मार्चपासूनच्या विस्ताराचा सर्वात मजबूत दर दर्शविला आहे जो दीर्घकालीन सरासरीपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, आउटपुट चार्ज चलनवाढीच्या मंदीच्या दरम्यान कंपन्या आर्थिक दृष्टीकोनाबद्दल उत्साहित राहिल्याने वेतनवाढीची शक्यता चांगलीच वाढली आहे. तसेच, खर्चाचा दबाव चार वर्षांतील नीचांकी पातळीवर परत आल्याने मोठा फायदा झाला आहे, असे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

आउटपुट चार्ज किंवा किमतीची चलनवाढ ही उत्पादनांची फॅक्टरी सोडल्यानंतर किरकोळ विक्रेते आणि घाऊक विक्रेत्यांना विकण्यापूर्वी त्यांच्या किंमती किती बदलतात याचे मोजमाप करण्यात आले आहे. ग्राहक किंमत चलनवाढीतील संभाव्य बदलांचे हे प्रमुख सूचक असू शकते. पॅनेल सदस्यांच्या मते, उत्पादकता वाढ आणि मागणीच्या सकारात्मक ट्रेंडमुळे वाढीचा आधार घेतला गेला.


Powered By Sangraha 9.0