मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Ramgiri Maharaj News) पालघरमधील डॉ. मोहम्मद साद नावाच्या एका डॉक्टरला महंत रामगिरी महाराज यांच्याविरोधात सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी नुकतीच अटक करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात मोहम्मद साद याने सोशल मिडियावर रामगिरी महाराजांचा फोटो पोस्ट करून ‘सर तन से जुदा’ शिक्षेबाबत विधान केले होते. स्थानिक वृत्तानुसार, डॉ. मोहम्मद सादच्या विरोधात एका व्यक्तीने दाखल केलेल्या तक्रारीच्या परिणामी ही अटक झाली आहे.
हे वाचलंत का? : प्रार्थना सभेच्या नावाखाली महिला-बालकांचे धर्मांतरण!मोहम्मद सादने रामगिरी महाराजांचा फोटो पोस्ट करून कॅप्शन मध्ये लिहिले होते की, “गोमूत्र पिणारे आणि शेण खाणारे आमच्या देवाबद्दल बोलण्याच्या लायकीचे नाहीत. जो कोणी असे करेल त्याला सर तन से जुदाची शिक्षा दिली जाईल.” मोहम्मद सादने लिहिलेल्या या आक्षेपार्ह पोस्टमुळे पालघर पोलिसांनी सदर कारवाई केली आहे.
नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये काही दिवसांपूर्वी अखंड हरिनाम सप्ताह सुरु होता. तेव्हा महंत रामगिरी महाराजांनी एका प्रवचनादरम्यान अल्पसंख्याक समाजाच्या धर्मगुरूंविरूध्द त्यांनी वक्तव्य केले होते. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरसह अनेक ठिकाणी अल्पसंख्याकांकडून रामगिरी महाराजांविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. त्यामुळे रामगिरी महाराजांविरोधात गुन्हेही दाखल करण्यता आले. आपण केलेल्या वक्तव्याच्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी असल्याचे, रामगिरी महाराजांनी म्हटले आहे.