लखनऊ : लव्ह जिहादच्या (Love Jihad) प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशातील बिदाऊ जिल्ह्यात लव्ह जिहादचे प्रकरण आढळून आले आहे. हिंदू मुलीला नाव बदलण्यासाठी, विवाह करण्य़ासाठी आणि नंतर इस्लाम धर्मांतरणासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे. तसेच पीडितेला मांस खाण्यावरून आणि तिला नमाज अदा करण्यासाठी दबाव आणला गेल्याचे पीडितेने याविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणाचा पोलिसांनी ३ सप्टेंबर रोजी तपास सुरू केला आहे.
हे प्रकरण बदाऊनच्या बिसौली पोलीस ठाणे परिसरातील आहे. मंगळवारी एका हिंदू तरूणीने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पीडितेने तक्रारीत म्हटले की, ती मूळची बदाऊनची आहे. २०२३ मध्ये पीडित मुलगी चंदीगड येथील एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करत होती. याचठिकाणी काम करत असताना सोहेल नावाच्या कट्टरपंथी युवक पीडितेला भेटला होता. त्यावेळी कट्टरपंथी सोहेलने आपण हिंदू असल्याची खोटी ओळख करून दिली. पीडितेला विश्वासात घेऊन तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपचे नाते ठेवले. त्यावेळी आरोपीने पीडित हिंदू युवतीवर अमानुष अत्याचार करत लैंगिक शोषण केल्याने पीडित हिंदू मुलगी गरोदर राहिली.
तक्रारीत पीडितेने सांगितले की, काही दिवसांनी ती एका मुलीची आई झाली होती. मुलीच्या जन्मानंतर सोहेल पीडितेला घेऊन बदाऊनला आला. घरी आल्यानंतर पीडितेने सोहेल हा कट्टरपंथी असून पीडितेची फसवणूक झाल्याचे समजले असता, सोहेल आणि त्याच्या कुटुंबियांनी गेल्या ३ महिन्यांपासून पीडितेचे अत्याचार केले.
तक्रारीत पुढे लिहिले की, तिला मारहाण केली गेली होती. तिला धर्मांतरण करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला जात होता. आरोपीचे म्हणणे ऐकण्यास नकार दिल्याने मंगळवारी सोहेलचे वडील नियामू, त्याची आई रुखसाना आणि त्याच्या बहिणी रुबिना आणि झेबा सर्व आरोपींनी पीडितेला बेदम मारहाण केली होती. तिला घरातून पळवून घेऊन गेले. याप्रकरणात सर्व आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी पीडितेने केली आहे. बदाऊन पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला.