अमोनियाचा कंटेनर उलटला - केमिकल गळती होऊन वाहतूक ठप्प

04 Sep 2024 13:01:05

thane accident
 
 ( WIKIPEDIA : FILE PHOTO ) 
 
ठाणे, दि.३ : प्रतिनिधी : ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील पाटलीपाडा (Patlipada) उड्डाणपुलानजीकचा रस्ता अपघात प्रवण बनला आहे. गेल्या काळात अनेक लहान - मोठे अपघात झालेल्या या ठिकाणी केमिकल वाहून नेणाऱ्या कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अमोनियाचा कंटेनर उलटल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीनंतर घडली. या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान कंटेनर उलटल्याने केमिकल गळती होऊन वाहतूक कोंडी झाली होती
.
न्हावा-शेवा ते पंजाब येथे २७ टन अमोनिया केमिकल भरलेला कंटेनर घेऊन चालक शिवेंद्र सिंग निघाला होता. कंटेनर घोडंबंदर रोडवर पाटलीपाडा उड्डाणपुलाजवळ, तबेल्याच्या समोर आल्यानंतर कंटेनरला अपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर उलटला. त्यामुळे कंटेनर मध्ये असलेले अमोनिया केमिकल गळती झाली. सदरची माहिती पोलीस कर्मचारी यांच्याकडून संबंधित केमिकल कंपनीतील कर्मचाऱ्यांना कळविण्यात आली. घटनास्थळी केमिकल कंपनी कर्मचारी, वाहतूक पोलीस कर्मचारी, २ हायड्रा मशीनसह, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान हायराईज फायर वाहनासह पोहोचले. चार तासानंतर उलटलेला केमिकल कंटेनर बाजूला करण्यात आला.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0