नवी दिल्ली: भारत – कझाकस्तानच्या आठव्या संयुक्त सरावास उत्तराखंडमधील औली येथील सूर्या फॉरेन ट्रेनिंग नोड येथे प्रारंभ झाला आहे. ‘कॅझइंड २०२४’ असे या सरावाचे नाव असून २०१६ पासून त्याचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी ३० सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर या कालावधीत हा सराव होणार आहे. सरावामध्ये १२० कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या भारतीय सशस्त्र दलाचे प्रतिनिधित्व भारतीय लष्कराच्या कुमाओन रेजिमेंटच्या बटालियनद्वारे इतर शस्त्रास्त्रे आणि सेवा तसेच भारतीय हवाई दलातील कर्मचारी करत आहेत.
कझाकिस्तानच्या तुकडीचे प्रतिनिधित्व प्रामुख्याने लँड फोर्स आणि एअर बोर्न ॲसॉल्ट ट्रॉपर्सचे कर्मचारी करत आहेत. संयुक्त सरावाचा उद्देश संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरअंतर्गत उप-पारंपारिक परिस्थितीत दहशतवादविरोधी कारवाया करण्यासाठी दोन्ही बाजूंची संयुक्त लष्करी क्षमता वाढवणे आहे. या संयुक्त सरावात निमशहरी आणि डोंगराळ प्रदेशातील ऑपरेशन्सवर भर दिला जाईल. संयुक्त सरावाद्वारे म्हणजे उच्च दर्जाची शारीरिक तंदुरुस्ती, रणनीतीच्या पातळीवर ऑपरेशन्ससाठी रिहर्सलिंग आणि रिफाइनिंग ड्रिल्सची उद्दिष्टे साध्य केली जाणार आहेत.
संयुक्त सरावादरम्यान दहशतवादी कारवाईला संयुक्त प्रतिसाद, जॉइंट कमांड पोस्टची स्थापना, इंटेलिजेंस आणि पाळत ठेवण्यासाठी केंद्राची स्थापना, हेलिपॅड/लँडिंग साईट सुरक्षित करणे, कॉम्बॅट फ्री फॉल, स्पेशल हेलिबॉर्न ऑपरेशन्स, कॉर्डन आणि सर्च यांचा समावेश आहे. ऑपरेशन्स, ड्रोन आणि काउंटर ड्रोन सिस्टीम आदींचा अभ्यास करण्यात येणार आहे.