आयकर विभागाने घेतला मोठा निर्णय; लेखापरीक्षण अहवालास मुदत वाढ!

30 Sep 2024 16:05:09
government-extended-the-deadline-for-submitting


मुंबई :   आयटीआर फाईलिंग करणाऱ्यांसाठी आयकर विभागाकडून मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे. आयकर विभागाकडून आयटीआर फाईलिंगसाठी मुदतवाढ करण्याची तयारी करण्यात आली असून ७ ऑक्टोबरपर्यंत आयटीआर फाईलिंग करण्यात येणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने आयकर लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याची मुदत वाढविली आहे. लेखापरीक्षण अहवाल दाखल करताना सरकारला येणाऱ्या अडथळे पाहता ही मुदत ३० सप्टेंबर ते ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात येत आहे.
 

 

दरम्यान, आयकर कायद्यांतर्गत विविध लेखापरीक्षण अहवाल इलेक्ट्रॉनिक फाईलिंगमध्ये करदात्यांना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेता आयकर विभागाने २०२३-२४ चा ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची मुदत सात दिवसांनी वाढवून दि. ०७ ऑक्टोबर केली आहे, असे आयकर विभागाने एका परिपत्रकात म्हटले आहे.

लेखा आणि सल्लागार कंपनी मूर सिंघीचे कार्यकारी संचालक रजत मोहन म्हणाले की, कर लेखापरीक्षण अहवाल इलेक्ट्रॉनिक फाइलिंगमध्ये तांत्रिक अडचणींमुळे सरकारला मुदत आणखी सात दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यामुळे आता ७ ऑक्टोबरपर्यंत लेखापरीक्षण करून अहवाल दाखल करता येणार आहे.





Powered By Sangraha 9.0