सपा नेत्याची खुली धमकी! "आता मुस्लिमांच्या संख्येत वाढ होतेय, २०२७ मध्ये योगी राजवट जाणार"

30 Sep 2024 14:32:36
 
Mehaboob Ali
 
लखनऊ : समाजवादी पक्षाचा कट्टरपंथी नेता म्हणून ओळख असलेल्या मेहबूब अलीने (Mehaboob Ali)  भडकाऊ विधान केले. त्यांनी आपल्या भाषणात संविधानाचा उल्लेख करत नाव न घेता भाजप आणि उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी दिली आहे. "आता मुस्लिमांच्या संख्येत वाढ होतेय, २०२७ मध्ये योगी राजवट जाणार" , असे वक्तव्य त्यांनी त्यांच्या भाषणात केले. २९ सप्टेंबर रोजी त्यांनी केलेल्या भाषणात भडकाऊ वक्तव्य केलेल्या भाषणाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील अमरोह येथील बिजनौरचे आहे. शहरातील रामलिला मैदानावर संविधान स्थापन मनस्तंभ कार्यक्रम स्थापन केला असता त्यावेळी त्याने गरळ ओकली.
 
व्हायरल होत असलेल्या संबंधित व्हिडिओत मेहबूब अलीने सर्वप्रथम मुस्लिमांच्या टक्केवारी भाष्य केले. ते म्हणाले की, येत्या काळात तुमची राजवट संपुष्टात येणार आहे. मुस्लिमांच्या लोकसंख्येत आता वाढ होऊ लागली आहे. हे राज्य ८५० वर्षे राज्य करणाऱ्या मुघलांच्या हाती आले नाही, असा मेहबूब अली म्हणाला.
 
त्यानंतर तो म्हणाला की, आज देशाची दिशाभूल केली जात आहे पण भारतातील जनता आता जागी झाली असल्याचा दावा त्यांनी केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष करत मेहबूब म्हणाला की, तुम्ही आता २०२७ मध्ये उत्तरप्रदेशातून जाल. इंशाअल्लाह आम्हीच येथे निवडून येऊ, मेहबूब अली यांच्या विधानाने मंचावर आणि उपस्थितांनी टाळ्या वाजवत पाठिंबा दिला.
 
Powered By Sangraha 9.0