माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मुलीच्या वाहनाचा अपघात

    30-Sep-2024
Total Views |

 Sanjana Jadhav Accident
 
चाळीसगाव : माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या मुलीच्या वाहनाचा अपघात  (Sanjana Jadhav Accident) झाल्याची घटना २० सप्टेंबर रोजी घडली. धुळे-सोलापूर महामार्गावरील चाळीसगाव तालुक्यात रांजणगाव येथे हा अपघात झाल्याची घटना आहे. 
 
प्रसारमाध्याने दिलेल्या माहितीनुसार, एका पिक-अप चालकाने दावनेंची मुलगी संजना जाधव यांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात संजना जाधव सुखरूप असून थोडक्यात बचावल्या गेल्या आहेत. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना या कन्नड येथून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. याचपार्श्वभूमीवर त्यांचा अपघात झाल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
 
आगामी विधानसभा निवडणूक जवळ येत आहेत. याचपार्श्वभूमीवर संजना जाधव आता त्यांच्या जिल्ह्यात नागरिकांच्या भेटी घेत आहेत. दरम्यान संजना जाधव या धुळे येथे निघाल्या होत्या यावेळी चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव नजीक येथे समोरून येणाऱ्या पिक-अपने वाहनाला जोरदार धडक दिली. यामुळे दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
 
याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली. या अपघातात पिक-अप चालक आणि संजना जाधव या थोडक्यात बचावले गेले .