रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरच्या पुनर्वसन प्रकल्पांबद्दल महत्वाचा निर्णय!

30 Sep 2024 18:12:13
 
Ramabai Ambedkar Nagar
 
मुंबई : रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देण्यासाठी एमएमआरडीएला जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.
 
रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कुर्ला येथील १४ हेक्टर जमिनीची रेडिरेकनरनुसार २५ टक्के जमीन अधिमूल्याची रक्कम सुरूवातीला न घेता प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विक्री करून मिळणाऱ्या रकमेतून हे अधिमूल्य भरण्याची सवलत एमएमआरडीएला देण्यात येणार आहे.
 
हे वाचलंत का? -  राज्य सरकार उभारणार परवडणारी घरे!
 
या प्रकल्पासाठी घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगरमधील १६ हजार ५७५ पैकी केवळ ७ हजार ५२९ रहिवासी पात्र ठरले आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) पूर्वमुक्त मार्गाचा विस्तारीकरण प्रकल्प हाती घेणार आहे. एमएमआरडीएकडून रमाबाई आंबेडकरनगर येथील ३३.१५ हेक्टर जागेचा विकास करून तेथील अंदाजे १४,२५७ झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमएमआरडीए आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) यांच्या माध्यमातून हे पुनर्वसन केले जाणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0