मुंबई : सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून यात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. दरम्यान, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच यासाठी एमएमआरडीएला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
हे वाचलंत का? - मंत्रीमंडळाचे ३८ महत्वाचे निर्णय! शिक्षक भरती, कोतवालांच्या मानधनात वाढ
हा प्रकल्प ९ हजार १५८ कोटी रुपयांचा असून राज्य शासनाच्या करासाठी ६१४ कोटी ४४ लाख रुपये, केंद्राच्या कराच्या पन्नास टक्के रकमेसाठी ३०७ कोटी २२ लाख रुपये, भुसंपादनासाठी ४३३ कोटी असे एकूण १ हजार ३५४ कोटी ६६ लाख रुपये बिनव्याजी दुय्यम कर्ज म्हणून उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.