मुंबई : लोकसभा निवडणुकीत मतांचा खडखडाट होता म्हणून आपल्या पिताश्रींनी सर्व कट्टर राजकीय विरोधकांच्या घरी जाऊन हात जोडले, असा घणाघात भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सुप्रिया सुळेंवर केला आहे. सुप्रिया सुळेंनी अर्थव्यवस्थेवर टीका केली होती. यावर त्यांनी प्रत्युत्तर दिले.
केशव उपाध्ये म्हणाले की, "सुप्रियाताई यांना अलिकडे फारच साक्षात्कार होऊ लागले आहेत. आज त्यांना अचानक अर्थव्यवस्था चांगली नसल्याचा साक्षात्कार झाला. पण सरकारी अर्थव्यवस्थेतील किती ज्ञान यावर चर्चा व्हायला हवी. चॅनेलवर झळकायचे असले तर उलटसुटल बोलत रहायचे हे त्यांना इतक्या वर्षात कळलंय आणि त्या तेच करत आहेत. कोणीतरी काही तरी बोललं की, त्यावर काहीतरी प्रतिक्रिया द्यायची आणि ते जमलं नाही तर कोणताही विषय राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली, फडणवीसांनी राजीनामा द्यावा, असे बोलायचे इतकंच त्यांचं ज्ञान आहे हे राज्यातील जनतेला महिती आहे."
हे वाचलंत का? - आनंद दिघेंप्रमाणेच मुख्यमंत्री शिंदेंचाही घातपात करण्याचा डाव; शिरसाटांचे गंभीर आरोप
ते पुढे म्हणाले की, "तुमच्या लोकसभा निवडणुकीत मतांचा खडखडाट होता म्हणून आपल्या पिताश्रींनी सर्व कट्टर राजकीय विरोधकांच्या घरी जाऊन अगदी बारामतीतील काकडे, भारचे थोपटेंसह सर्वांना हात जोडले. त्यामुळे तुम्ही निवडून आला आहात, हे कधीही विसरू नका," असा सल्लाही केशव उपाध्येंनी दिला आहे.