रांची : झारखंड जिल्ह्यातील रांची येथे काली मंदिरासमोर अवैध मांस आढळल्याची (Illegle Meat Smuggling) माहिती सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून आढळली. ही घटना रविवारी २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजता घडली आहे. यामुळे आता रांची येथील स्थानिक हिंदू या घडलेल्या प्रकरणाने संतापले आहेत. हे प्रकरण रांची येथील एचबी रोड येथील आहे. यावेळी काही स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घडलेले प्रकरण हताळण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्यापही तणावाची परिस्थिती आहे.
ज्यांनी असे कृत्य केले आहे त्यांना लवकरात लवकर ताब्यात घ्यावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. हे धार्मिक भावना दुखावणारे कृत्य असून लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे,. याप्रकरणाने धार्मिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
हा संताप सुरू असताना अशीच एक घटना रांची येथील चादरी सरनस्थल रोड येथे घडली होती. हे प्रकरण आणखी चिघळू नये म्हणून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तातडीने कारवाई केली आणि संबंधित घटनास्थळावरून मांस हटवले आहे. मात्र याप्रकरणात नेमका कोणाचा हात आहे? अशा प्रकारचे कृत्य करणारी लोकं कोण असावीत असा सवाल उपस्थित होत आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता याप्रकरणात मोठा खुलासा निर्माण झाला. रांचीचे पोलीस अधिकारी सुमित अग्रवाल यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्वकाही स्फष्टपणे दिसत आहे. सकाळी ११.२ वाजता एका ट्रॅक्टर आणि ट्रॉली जात होती, त्यातून एक मांस असलेली गोणी खाली पडली. त्यातून मांस खाली पडले असता हे मांस एकाच ठिकाणी न पडता वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले दिसले होते. यामुळे रांचीतून अवैध मांस तस्करी केली जात असल्याचा दावा आता पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी येत्या ४८ तासांमध्ये मांस तस्करींना अटक केली जाईल असे आश्वासन आंदोलकांना केले आहे. ता याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.