विश्व हिंदू परिषदेच्या संघटनेने मध्यस्ती केली असता समाजकंटकांकडून दगडफेक
30-Sep-2024
Total Views |
लखनऊ : उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात गरीब हिंदूंना बकऱ्यांचे अमिष दाखवून धर्मांतरण (conversion) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना २९ सप्टेंबर रोजी घडली असून स्थानिकांनी गोंधळ घातला आहे. याप्रकरणी घटनास्थळी काही हिंदू संघटनांनी धाव घेतली. तेव्हा त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून काही जणांना ताब्यात घेतले आहे.
हे प्रकरण प्रयागराज जिल्ह्यातील सराईनायत पोलीस ठाणे हद्दीतील आहे. रविवारी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांनी तक्रारीत म्हटले की, रविवारी दुपारी बाराच्या सुमारास सरपतीपूर या गावात एका सभेच्या नावाने लोकांचा मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात काही लोकं ख्रिश्चनांचा उदोउदो करत होते. तर हिंदूंबाबत अपशब्द वापरत होते असा आरोप करण्यात आला. यावेळी संबंधित समाजकंटकांनी हिंदूंविरोधात देवी-देवतांबाबत अगदी खालच्या पातळीवर टिप्पणी केली होती.
या प्रकरणाची माहिती हिंदूंना होताच त्यांनी गावात प्रवेश करत संबंधित हिंदूंना धर्मांतरणाबाबत सांगितले. बकरी देण्याचे अमिष दाखवून हिंदूंना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जात असल्याचे काही हिंदू युवकांनी गावात जाऊन संदेश दिला. अशोक कुमार, मदन बिंद, डॉ. मुन्ना लाल निगम आणि सुरज कुमार वर्मा हे या घटनेचे सूत्रधार आहेत.
बकरी का लालच हिंदुओं के देवताओं की निंदा
जिस पवित्र प्रयागराज में 3 माह बाद होना है संसार का सबसे बड़ा धार्मिक समागम 'महाकुंभ' वहाँ हिंदुओं के सामूहिक ईसाई धर्मांतरण की शिकायत पर @VHPDigital आक्रोशित@prayagraj_pol के सरायइनायत क्षेत्र की घटना
आरोपी हे प्रयागराज येथील रहिवासी आहेत. हिंदू सदस्यांच्या रहिवासी आणि गावकऱ्यांनी त्यांना थांबवले असता, त्यांच्या १० अज्ञात साथीदारांसह दगडफेक सुरू केली. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणातील पोलिसांनी चार मुख्य आरोपींना ताब्यात घेतले आहे.
या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत हिंदू संघटनेच्या सदस्यांनी पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करत नसल्याचा आरोप केला आहे. या व्हि़डिओत चारही आरोपी पोलिस ठाण्यात बसलेले आहेत. त्यांच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम ३०२ आणि १२५ अंतर्गत उत्तर प्रदेश धार्मिक धर्मांतर प्रतिबंध कायद्यांसह कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणात पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत.