मुंबई : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा हा शेवटचा आठवडा सुरू असून या अंतिम टप्प्यात पंढरीनाथ कांबळे यांनी घराचा निरोप घेतला. आता घरात केवळ ७ सदस्य राहिले असून घरात आपलं स्थान अधिक पक्क करण्यासाठी प्रत्येकजण आटापिटा करताना दिसत आहेत. आता बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सदस्यांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार असून घरात तिकीट टू फिनालेचा टास्क रंगणार आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे.
रस्सीखेचच्या या टास्कमध्ये बाबा गाडीवरुन सदस्यांना घरभर फिरून झेंडे गोळा करायचे आहेत. कमी वेळेत जास्तीत जास्त झेंडे गोळा करणाऱ्या सदस्याला
तिकीट टू फिनालेचा टास्क खेळता येणार आहे. यासाठी बिग बॉसच्या घरातील सदस्य अपार प्रयत्न करताना दिसत आहेत. बाबा गाडीवरुन झेंडे गोळा करताना सदस्यांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता कोण बाजी मारून बिग बॉस मराठीच्या फायनलचं तिकीट मिळवतं, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
दरम्यान, या आठवड्यात 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन ७० दिवसांमध्येच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ६ ऑक्टोबरला 'बिग बॉस मराठी'चा अंतिम सोहळा रंगणार असून 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता किंवा विजेती मिळणार आहे. आता वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, निक्की तंबोळी, धनंजय पोवार यांपैकी कोण 'बिग बॉस मराठी'ची ट्रॉफी नावावर करणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.