देशी गायींच्या पालन-पोषणासाठी सरकारची 'अनुदान योजना'

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

    30-Sep-2024
Total Views |

Cow-Anudan Yojana

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Indian Cow Anudan Yojna)
राज्यातील गोशाळांमधील देशी गायींच्या पालन-पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय पन्नास रुपये अनुदान योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सोमवार, दि. ३० सप्टेंबर रोजी कॅबिनेट बैठक झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबत माहिती दिली. या बैठकीत देशी गायींना राज्यमाता म्हणून घोषित केल्याचा आदेशही जारी करण्यात आला आहे.

पुढे ते म्हणाले, गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने तसेच आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने, त्यांच्या बळकटीकरीता हा निर्णय घेण्यात आला. या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा गोशाळा पडताळणी समिती असेल. २०१९ मधील २० व्या पशू गणनेनुसार देशी गायींची संख्या ४६ लाख १३ हजार ६३२ इतकी कमी असल्याचे आढळून आले आहे. ही संख्या १९व्या पशूगणनेशी तुलना करता २०.६९ टक्क्यांनी कमी झाली आहे.