टीम इंडियाच्या माजी क्रिकेटरच्या नातलगांच्या मारेकऱ्यांना जन्मठेप; चार वर्षांच्या खटल्यानंतर न्यायालयाचा निकाल

03 Sep 2024 16:01:18
pathankot-court-sentences-men-to-life-imprisonment


नवी दिल्ली :      टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या नातेवाईकांच्या हत्येप्रकरणी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पठाणकोट जिल्हा न्यायालयाने सर्व १२ आरोपींना जन्मठेपेसह प्रत्येकी दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. आरोपींमध्ये शाहरुख, मोहब्बत, रिहान, अस्लम, ताजवाल बीवी, काझम, चाहत, जबराना, आमिर, सेहजान, बाबू मियाँ आणि मॅचिंग यांचा समावेश आहे.

दरम्यान, या सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत कारागृहात पाठवण्यात आले आहे. पठाणकोटच्या एडीजे जितेंद्र पाल खुर्मी यांच्या कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली असून ४ वर्षे चाललेल्या या खटल्यात बचाव पक्षाकडून अनेकदा युक्तिवाद करण्यात आले. त्यानंतर फिर्यादी पक्षाने कोर्टात सर्व पुरावे सादर करून या प्रकरणात आरोपींविरोधात गुन्हा सिध्द केला आहे.

माजी क्रिकेटर सुरेश रैनाचे काका आणि भावाच्या १२ नराधमांना न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आली आहे. दि. १९ ऑगस्ट २०२० रोजी रात्री हल्लेखोरांनी पठाणकोट जिल्ह्यातील थारियाल गावात घराला लक्ष्य केले होते. हे घराचे कॉन्ट्रॅक्टर अशोक हे क्रिकेटर सुरेश रैनाचे काका असल्याचे समोर आले. हल्लेखोरांनी घरातील झोपलेल्या सदस्यांवर धारदार शस्त्रांनी वार केले. या काळात पुरुषांसोबत महिलांनाही लक्ष्य करण्यात आले होते. घटनेच्या वेळी पीडितेच्या कुटुंबातील बहुतांश सदस्यांचा आरडाओरडा ऐकल्याने आजूबाजूचे लोक जमा होऊ लागल्याने हल्लेखोर पळून गेल्याचे समोर आले होते.



Powered By Sangraha 9.0