प्रार्थना सभेच्या नावाखाली महिला-बालकांचे धर्मांतरण!

03 Sep 2024 14:49:46

Raebareli Conversion

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Raebareli Conversion) 
उत्तर प्रदेशच्या रायबरेली जिल्ह्यात प्रार्थना सभेच्या नावाखाली महिला व बालकांच्या धर्मांतराचे प्रकरण समोर आले आहे. हिंदू संघटनांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस घटनास्थली दाखल झाले. तेव्हा धर्मांतरात सहभागी असलेले काही लोक घटनास्थळावरून पळून गेले, मात्र एका तरुणास अटक करण्यात आली आहे.

हे वाचलंत का? : हिंदू महिलांसमोर कट्टरपंथी युवकांचे अश्लील कृत्य



मिळालेल्या वृत्तानुसार, रायबरेली जिल्ह्यातील मुन्शीगंज बायपासवर असलेल्या एका घरात रविवारी प्रार्थना सभा बोलावण्यात आली होती. याठिकाणी अनेक महिला व बालकांना बैठकीसाठी बोलावण्यात आले. प्रार्थना सभेच्या नावाखाली महिला आणि मुलांना बोलावून त्यांचे धर्मांतर केले जात असल्याची माहिती हिंदू संघटनांना मिळाली. हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोहोचून निषेध केला. संपूर्ण प्रकरणाची माहिती त्यांनी पोलिसांना फोन वरून दिली. त्यांनतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून कारवाई केली आहे.
Powered By Sangraha 9.0