मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआय)कडून बँकांच्या सुट्टीसंदर्भात यादी जाहीर करण्यात येते. त्यानुसार, ऑक्टोबर महिन्यात जवळपास १५ दिवस सुट्ट्या बँक कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्यांचा समावेश असून ऑक्टोबर महिन्यात गांधी जयंती , नवरात्री , दसरा आणि दिवाळी या दिवशी बँका बंद असतील.
सप्टेंबर महिना संपायला आता दोन-तीन दिवस उरले असून ऑक्टोबर महिन्यात बँकांना अर्धा महिना बंद असणार आहेत. या महिन्यात गांधी जयंती, नवरात्री, दसरा आणि दिवाळी सारख्या सणांमुळे बँकांचे कामकाज बंद असणार आहे. दरम्यान, आरबीआयकडून बँकांच्या रजांसंदर्भात यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे खातेधारकांना आपली नियोजित कामे लवकर करावी लागणार आहेत.
दर महिन्याप्रमाणे ऑक्टोबरमध्ये अनेक राष्ट्रीय आणि राज्यनिहाय सुट्ट्या येणार आहेत. त्यामुळे सरकारी कार्यालये, बँका आणि शेअर बाजारही बंद राहणार आहेत. या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यात असणार आहेत. ऑक्टोबरमध्ये एकूण १५ दिवस बँका बंद राहणार असून या बँकांच्या सुट्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी असणार आहेत.