परदेशी गुंतवणूकदारांच्या निर्णयाने ठरेल शेअर बाजाराची दिशा; तज्ज्ञांचे मत

29 Sep 2024 15:22:53
market-outlook-global-trends-the-directiond
 
 
मुंबई :     भारतीय भांडवली बाजारात परेदशी गुंतवणूकदारांचा ओढा प्रचंड असल्याचे पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील वाढत्या कॅश फ्लोमुळे मार्केटमध्ये प्रचंड वोलॅटिलिटी दिसून येत आहे. जागतिक ट्रेंड, परदेशी गुंतवणूकदारांच्या सक्रियता आणि देशांतर्गत आघाडीवरील स्थूल आर्थिक डेटा या गोष्टी शेअर बाजाराची दिशा ठरवतील, असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.


परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (एफआयआय) प्रवाहावर लक्ष ठेवणे हे मनोरंजक असेल. भारतीय शेअर बाजारात या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वाधिक एफआयआयचा ओघ दिसून आला. कमोडिटीच्या किमतीतील चढउतार, यूएस डॉलर इंडेक्स आणि तेथील मॅक्रो इकॉनॉमिक डेटा देखील बाजाराला दिशा देईल, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात जागतिक ट्रेंड आणि परदेशी गुंतवणूकदारांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्याचबरोबर यूएस डॉलर इंडेक्स आणि तेथील मॅक्रो इकॉनॉमिक डेटा देखील बाजाराला दिशा देईल. परदेशी निधीचा प्रवाह आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील चढउतार यावरही सर्वांचे लक्ष असेल. आगामी काळात गुंतवणूकदार कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांवर लक्ष ठेवतील. कंपन्यांच्या उत्पन्नात सुधारणा होण्याची अपेक्षा गुंतवणूकदारांना आहे.



Powered By Sangraha 9.0