इस्रायलच्या हल्ल्यात आणखी एक दहशतवादी ठार !

29 Sep 2024 17:51:54

kouk
 
 
नवी दिल्ली : हिजबुल्लाह या दहशवादी संघटनेचा वरिष्ठ कमांडर नाबिल कौक याचा शनिवारी रात्री इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे. कौक हा हिजबुल्लाहच्या "प्रीव्हेंटीव सिक्युरीटी युनिट" चा कमांडर होता आणि दहशतवादी गटाच्या केंद्रीय परिषदेचा वरिष्ठ सदस्य होता अशी माहिती माध्यमांना मिळाली आहे. नसराल्लाहा या हिजबुल्लाहाच्या प्रमुख नेत्याच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी ही घटना घडली आहे.
 
कौक हा हिजबुल्लाच्या नेतृत्वाच्या जवळचा मानला जात होता आणि अलीकडच्या काळात इस्रायल राज्य आणि तेथील नागरिकांविरुद्ध दहशतवादी हल्ले करण्यात त्याचा थेट सहभागी होता. कौक याने १९८०च्या दशकापासून हिजबुल्लाह संघटनेत सक्रीय होता. त्याच बरोबर दक्षिण लेबनॉन मध्ये दहशतवादी कृत्ये करणाऱ्या अली कराकीला सुद्धा ठार करण्यात आले आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हिजबुल्लाहावरील हल्ल्यावर प्रतिक्रीया देत संयुक्त राष्ट्र परिषदेत म्हटले की हसन नसराल्लाह याचा खात्मा इस्रायलच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक होता. नसराल्लाह हा केवळ दहशतवादी नव्हता, तो आणि त्याचे लोक इस्राएलचा नाश करण्याच्या योजनेचे शिल्पकार होते. इस्रायलच्या नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी दहशतवाद्यांचा खात्मा आवश्यक होता. नसराल्लाह आणि त्याच्या दहशतवादी संघटनेने आजवर शेकडो अमेरीकी नागरिकांचा जीव घेतला आहे. त्याचा शेवट झाल्याने आज एका प्रकारे त्या तमाम पीडीतांना न्याय मिळाला आहे. नेतान्याहू यांच्या या वाक्याला अमेरीकेने दुजोरा दिला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0