"'विकसित भारत'मध्ये राज्याची मोठी भूमिका; सावित्रीबाई फुलेंच्या रूपाने..."

28 Sep 2024 13:41:43
union minister in pune tour


मुंबई : 
   'विकसित भारत'मध्ये महाराष्ट्र मोठी भूमिका निभावणार आहे, असे केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह यांनी सांगितले. 'विकसित भारत ॲम्बेसेडर - युवा कनेक्ट' उपक्रमाअंतर्गत एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांशी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले.


 
 
दरम्यान, महाराष्ट्र हे देशातील एक आर्थिक केंद्र असून महाराष्ट्राचा विकास अधिक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या १० वर्षांच्या कार्यकाळात अटल सेतू, समृद्धी एक्सप्रेसवे, समुद्री महामार्ग, मेट्रो यांसारखे अनेक मोठे प्रकल्प राज्यात कार्यान्वित झाले आहेत. त्यामुळे भारत हा विकसित देश बनत असताना महाराष्ट्र त्यामध्ये मोठी भूमिका निभावणार आहे, असा विश्वास केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी व्यक्त केला.

उपस्थित विद्यार्थ्यांना भारताची विकसित देश बनण्याच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल समजावून सांगितली. तसेच, पुणे शहर हे आपल्या अत्यंत आवडीचे शहर आहे. या शहराला सावित्रीबाई फुले यांच्या रूपाने मोठा वारसा लाभलेला आहे. यामुळेच महाराष्ट्र महिला शिक्षणाच्या बाबतीत देशात अग्रेसर आहे, असेही केंद्रीय मंत्री पुरी यावेळी म्हणाले.
 
पुण्यातील लोणी काळभोर येथील एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी महाविद्यालयात 'विकसित भारत ॲम्बेसेडर - युवा कनेक्ट' उपक्रमाअंतर्गत आज आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हरदीप सिंह पुरी बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाददेखील साधला. याप्रसंगी, माईर्स एमआयटी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष आणि कुलगुरू मंगेश कराड, निबंधक महेश चोपडे, तिरंदाजी खेळाडू आदित्य केदारी आदी मान्यवर उपस्थित होते.
 


Powered By Sangraha 9.0