मुंबई : टाटा इलेक्ट्रॉनिक्स लवकरच होसूर येथील नवीन आयफोन असेंबली प्लांटमध्ये नवीन कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. नवीन भरतीच्या माध्यमातून तब्बल २० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. या भरतीनंतर प्लांटमधील कर्मचाऱ्यांची संख्या ४० हजारांपर्यंत पोहोचेल, अशी माहिती टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले.
टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत कंपनीने होसूर, कृष्णगिरी येथे अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स कारखाना उभारला आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्स होसूर युनिटमध्ये २० हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याची घोषणा चंद्रशेखरन यांनी केली. त्यानंतर आता प्लांटमधील कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे.
ते म्हणाले, हा केवळ कारखाना नाही, तर अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाचे युनिट आहे. या प्लांटमध्ये उच्च दर्जाची वाहने तयार केली जातील. प्रथमच टाटा इलेक्ट्रॉनिक्सकडून प्रगत प्लॅटफॉर्म टाटा मोटर्स आणि जग्वार लँड रोव्हर (JLR) द्वारे संयुक्तपणे विकसित केले जाईल. एकदा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर, कारखाना ५ हजारांहून अधिक थेट नोकऱ्या निर्माण होतील. कंपनी एक नवीन परिसंस्था विकसित करेल, ज्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, असेही अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी सांगितले.