रेल्वेप्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! सणासुदीच्या काळात.....; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

    28-Sep-2024
Total Views |
special-train-good-news-for-the-people


नवी दिल्ली :     सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वेने १०८ गाड्यांमध्ये अतिरिक्त जनरल डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. दसरा, दिवाळी आणि छठपूजेच्या निमित्ताने घरी जाणाऱ्या लोकांची मोठी गर्दी लक्षात घेता रेल्वेने जादा गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे, असे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने विशेष व्यवस्था केली आहे.




दरम्यान, रेल्वेच्या निर्णयामुळे यूपी आणि बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार असून या राज्यांतील लोक सणासुदीच्या काळात सर्वाधिक प्रवास करतात. प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेऊन जागांसाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे १०० हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार आहे. सणासुदीच्या काळात कन्फर्म तिकीट मिळणे सोपे होणार आहे.

रेल्वेच्या निर्णयानंतर यूपी, बिहारमधील लोकांसाठी आनंदाची बातमी असून दिवाळी आणि छठ पूजेला घरी जाणाऱ्यांना ट्रेनमध्ये निश्चित जागा मिळणार आहे. दिवाळी आणि छठ पूजेदरम्यान १२,५०० विशेष गाड्या चालवल्या जातील, १ कोटी प्रवाशांना फायदा होईल. याशिवाय, लांब पल्ल्याच्या वेटिंग तिकिटांची समस्या दूर करण्यासाठी रेल्वे आपल्या ताफ्यात ३,००० नवीन गाड्या समाविष्ट करण्याचा विचार करत असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.