आंतरराष्ट्रीय ‘शिवसृष्टी रील महाकरंडक’ स्पर्धेचे आयोजन

28 Sep 2024 16:52:36


shivsrushti 

 पुणे : महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आंतरराष्ट्रीय ‘शिवसृष्टी रील महाकरंडक’ स्पर्धेचे २० ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजन करण्यात आले आहेत. या स्पर्धेची नोंदणी प्रक्रिया २६ सप्टेंबर २०२४ पासून सुरू झाली आहे. या स्पर्धेचे नेतृत्व प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक श्री. दिग्पाल लांजेकर करीत असून, प्रमुख ब्रँड अ‍ॅम्बेसेडर प्रसिद्ध अभिनेता श्री. अजय पुरकर आहेत. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री.जगदीश कदम यांचे मार्गदर्शन यासाठी लाभले आहे. या स्पर्धेत विजेत्याला सन्मानचिन्ह आणि १ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येईल. तसेच, अनेक उत्तेजनार्थ विजेत्यांसाठी लाखो रुपयांची पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ १० नोव्हेंबर २०२४ ला संपन्न होईल.

Powered By Sangraha 9.0