पंतप्रधान दुरदृष्य प्रणालीद्वारे साधणार आदिवासी बांधवाशी संवाद

प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाचे होणार थेट प्रक्षेपण

    28-Sep-2024
Total Views |

pm
 
 
ठाणे, दि.२८ : (Pradhan Mantri Janjatiya Unnat Gram Abhiyan) देशातील आदिवासी जमातींच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरिता “प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान” ही योजना राबविण्यात येत आहे.
 
देशातील आदिवासी जमातीच्या बांधवांसमवेत दि.०२ ऑक्टोबर रोजी दूरदृष्यप्रणालीद्वारे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. या योजनेच्या अंमलबजावणी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण संपूर्ण देशभर करण्यात येणार आहे. दूरदृष्यप्रणालीद्वारे होणाऱ्या पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणासाठी ठाणे जिल्हयातील भिवंडी, वडपे येथील शांग्रिला रिसॉर्टमधील हॉल निश्चित करण्यात आला आहे, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर, प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांनी कळविले आहे.