'सिने टॉकीज २०२४' कार्यक्रमासाठी नावनोंदणीला सुरुवात
मुंबई : संस्कार भारती तर्फे आयोजित ‘सिने टॉकीज २०२४’ या कार्यक्रमासाठी नावनोंदणीला सुरुवात झाली आहे. १३ डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत गोरेगाव फिल्मसिटीमधील व्हिसलिंग वुड्स इंटरनेशनल कॉलेजमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. ‘सिने टॉकीज’ कार्यक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. ‘भारतीय सिनेमा : वुड्स टू रूट्स’ हा या कार्यक्रमाचा या वर्षीचा विषय आहे. बॉलीवूड, कॉलीवूड, मॉलीवूड या सगळ्याच्या पलीकडे असलेल्या भारतीय सिनेमाच्या ‘स्वत्व:वर’ या कार्यक्रमात चर्चा होणार आहे. या कार्यक्रमासाठी नोंदणी शुल्क सदस्यांसाठी २५०० रुपये आणि विद्यार्थी प्रतिनिधींसाठी १००० रुपये असणार आहे. नोंदणी करण्यासाठी https://bit.ly/cinetalkies2024 या लिंकवर दिलेला गूगल फॉर्म भरावा.