डीलर, दलाल, दामाद.." अमित शाह यांची काँग्रेसवर घणाघाती टीका
28-Sep-2024
Total Views |
चंदीगड: "काँग्रेसच्या काळात हरियाणा मध्ये डीलर, दलाल, दामाद यांचं राज्य होतं" असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी केला. हरियाणा मधील रेवाडी इथल्या एका निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
काँग्रेसच्या कारकीर्दवर टीकास्त्र सोडत, शाह म्हणाले " काँग्रेसच्या काळात , लाच घेणाऱ्या, भ्रष्टाचार करणाऱ्या, लोकांचा सुळसुळाट होता. भाजपच्या राज्यात या सगळ्यांना चपराक बसला आहे." शहा पुढे म्हणतात, " राहुल गांधी यांना साधे रब्बी आणि खरीप पिकांमधील फरक सुद्धा कळत नाही. एमएसपी बद्दल बोलले म्हणजे मतं मिळतील असे राहुल गांधी यांना कुठल्यातरी एनजीओने सांगितले आहे. परंतु राहुल गांधी यांना एमएसपीचा फुल फॉर्म तरी ठाऊक आहे का ?" असा सवाल शाह यांनी केला आहे. भाजप सरकार हरियाणातील शेतकाऱ्यांकडून २४ पीके एमएसपीच्या दरात विकत घेत आहे. अशी माहिती दिली आहे. राहुल गांधी यांच्या अमेरीकेतील आरक्षणाच्या वक्तव्याचा शाह यांनी चांगलाच समाचार घेतला. " राहुल गांधी अमेरीकेत जाऊन मागसवर्गीयांना दिलेले आरक्षण संपवण्याची भाषा करतात, पण राहुल बाबाला मी सांगू इच्छीतो, जो पर्यंत भाजप सरकार आहे, तो पर्यंत कुणीही आरक्षण संपवू शकत नाही.
अग्निवीरांना पेन्शन सहीत नोकरी.
जाहीरनाम्यात दिलेल्या वचनांवर भाष्य करत, शाह म्हणाले " तरुणांनी सैन्यात सामील व्हावं, हरियाणा आणि भारत सरकार या अग्निवीरांना पेन्शन सहीत सरकारी नोकरी देईल. रेवाडी या भागातून मोठ्या प्रमाणात मुले सैन्यात भरती होतात, याचे श्रेय इथल्या मातांना जातं, ज्या माता आपआपल्या मुलांना त्याग आणि शौर्य याचे धडे देत वाढवतात. असे म्हणत अमित शाह यांनी इथल्या मातांचे कौतुक केले.