मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला दुसरं चिन्ह द्या, अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे. शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणूकीपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नवीन चिन्ह मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हे वाचलंत का? - वर्षा गायकवाडांच्या मतदारसंघावर 'उबाठा'चा डोळा! संजय राऊतांचं सूचक विधान
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांना दिले. दरम्यान, शरद पवार गटाने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एक याचिका दाखल करत विधानसभा निवडणूकीपूर्वी अजित पवार गटाचं घड्याळ चिन्ह बदलण्याची मागणी केली आहे. येत्या १ ऑक्टोबर रोजी यावर सुनावणी पार पडेल. दरम्यान, आता सर्वोच्च न्यायालय यावर काय निर्णय देणार, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.