‘पत्राचाळीचा लुटारू राऊत‘ या चित्रपटाची पटकथा कशी वाटेल? प्रविण दरेकरांचा राऊतांना सवाल

28 Sep 2024 13:06:09
 
Raut & Darekar
 
मुंबई : ‘पत्राचाळीचा लुटारू राऊत‘ या चित्रपटाची पटकथा कशी वाटेल? असा सवाल भाजप नेते प्रविण दरेकर यांनी संजय राऊतांना केला आहे. तसेच चघळून चोथा झालेल्या ‘चिंगम‘ संजय राऊतांनी ‘सिंघम‘ देवेंद्र फडणवीसांची चिंता करू नये, असेही ते म्हणाले. सामना वृत्तपत्रात आलेल्या अग्रलेखात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्यात आली होती. यावर आता दरेकरांनी प्रत्युत्तर दिले.
 
प्रविण दरेकर म्हणाले की, "महाराष्ट्रातील स्वयंघोषित चघळून चोथा झालेल्या ‘चिंगम‘ संजय राऊत यांनी ‘सिंघम‘ देवेंद्र फडणवीसांची चिंता करू नये. देवेंद्रजींबद्दल अग्रलेख लिहून टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न आहे. पण ही थुंकी संजय राऊतांच्याच तोंडावर पडली आहे. ज्यांनी आयुष्यभर ‘चमचेगिरी‘ केली त्या संजय राऊत यांना धर्मवीरची पटकथा काय कळणार? धर्मवीरची पटकथा लिहिणं आणि सामनाच्या अग्रलेखातून ‘चमचेगिरी‘ करणं यात फरक असतो," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  मविआत उबाठा गटाला 'इतक्या' जागा मिळणार! प्रकाश आंबेडकरांचा दावा
 
ते पुढे म्हणाले की, "देवेंद्र फडणवीसजी हे आधुनिक अभिमन्यू आहेत. तुमच्यासारख्या कितीही कपटी शकुनींनी त्यांना घेरलं तरी तुमचं चक्रव्यूह भेदण्यासाठी ते सक्षम आहेत. त्यामुळे तुम्ही देवेंद्रजींच्या चित्रपटाची काळजी करू नका. देवेंद्रजी फडणवीस जी पटकथा लिहितील तो चित्रपट सुपरहिट होईलच. पण त्यापूर्वी पत्राचाळीत मराठी माणसांची घरं तुम्ही हडप केली. त्यावर ‘पत्राचाळीचा लुटारू राऊत‘ या चित्रपटाची पटकथा कशी वाटेल? याचा विचार करा. मराठी माणसाला रस्त्यावर आणण्यासाठी तुम्ही जी खलनायकाची भूमिका वठवली, ती महाराष्ट्रातील जनता विसरली नाही. देवेंद्रजी फडणवीस जी हे इन्फ्रामॅन आणि महाराष्ट्राचे नायक आहेत. त्यासाठी संजय राऊत तुमच्यासारख्या नालायकाच्या सर्टिफिकेटची गरज नाही," असा घणाघात त्यांनी केला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0