मुंबई : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिस ढाल बनून मुंबईकरांच्या संरक्षणासाठी तत्पर आहेत. नवरात्रौत्सवात दहशतवाद्यांचे सावट असून गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे. हे लक्षात घेता गर्दीच्या
ठिकाणी पोलिसांची करडी नजर असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आगामी नवरात्रौत्सव हा सण पाहता धार्मिक स्थळांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यामुळे कानाकोपऱ्यात सुरक्षा तैनात करण्यात आली. रेल्वे स्थानक, मॉल्स, धार्मिक स्थळे या गर्दीच्या ठिकाणी नवरात्रौत्सवानिमित्त वादंग निर्माण होण्याची शंका नाकारता येत नाही. यासाठी गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त दक्षता घेण्यात येणार आहे. सणानिमित्ताने देवी मूर्तीसाठी नऊ दिवस मंडप बांधण्यात येणार आहेत. त्यावेळी हल्ले होणार असल्याची शक्यता असल्याने सतर्कता म्हणून पोलीस दल तैनात करण्यात आले.
यावेळी कोणताही विलंब न करता नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून माहिती द्यावी. सणाला गालबोट लागावे या उद्देशाने तेढ निर्माण करण्यासाठी काही समाजकंटक देशात फिरत आहेत. यामुळे खोली मालक, हॉटेल मालक, पर्यटक यांना याप्रकरणी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पासपोर्ट, व्हिसा काळजीपूर्वक तपासा, यावेळी मुंबई पोलिसांनी नागरिकांना सणावेळी तांत्रिक उपकरणे न वापरण्याचे आदेश दिले आहेत.