"त्यांचा स्नेह आणि आशीर्वाद मला लाभले.." पंतप्रधानांनी लतादीदींना वाहिली खास आदरांजली

28 Sep 2024 17:31:04

lata mangeshkar 
 
मुंबई : गानसम्राज्ञी आणि गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गायिका लता मंगेशकर यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना खास आदरांजली वाहिली आहे. “लता दीदींना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांच्या भावपूर्ण गाण्यांमुळे त्या लोकांच्या हृदयात आणि मनात कायम जिवंत राहतील. लता दीदी आणि माझा एक खास बंध होता. त्यांचा स्नेह आणि आशीर्वाद मला लाभले हे माझे भाग्य आहे.” अशा भावना ‘एक्स’ वर व्यक्त करत नरेंद्र मोदींनी लतादीदींना आदरांजली वाहिली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0