मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती पुढे आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा करण्यात येतात.
हे वाचलंत का? - "जरांगेंनी निवडणूक लढवली नाही तर ते पवारांच्या..."; प्रकाश आंबेडकरांचं विधान
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात वंचित राहिलेल्या लाभार्थी महिला आणि सप्टेंबर महिन्याच्या २५ तारखेपर्यंत अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना लाभ मिळणार आहे. ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला आहे त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ मिळणार आहे. तसेच ज्यांना काही अडचणींमुळे अद्याप लाभ मिळालेला नाही त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे ४५०० रुपये मिळणार आहेत. ज्या महिलांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाहीत त्यांच्या खात्यात २९ तारखेला पैसे येऊ शकतात.