ठाणे, दि.२८ : ठाण्यातील आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अवकाश निरीक्षण केंद्राचे (Dr. APJ Abdul Kalam Space Observatory) उदघाट्न सोमवार, दिनांक ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. काशिनाथ देवधर यांच्याहस्ते उदघाट्न होणार आहे.
ग्लोबल मिशन अस्ट्रॉनॉमी अँड रिसर्च सेंटर आणि हेन्कल टेक्नॉलॉजी कंपनी यांच्या विद्यमाने हे अवकाश निरीक्षण केंद्र सुरू होत आहे. हेन्कलच्या माध्यमातून याआधी अशी ११ केंद्र पुणे व नवी मुंबई येथे सुरु करण्यात आली आहेत. ठाण्यातील पहिले अवकाश निरीक्षण केंद्र आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये सुरु केले जाणार आहे. या समारंभासाठी हेन्कलचे मुख्य आर्थिक अधिकारी कृष्णा प्रसाद, ग्लोबल मिशनचे प्रमुख डॉ. प्रसाद खंडागळे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ मीरा कोर्डे तसेच आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन मोरे व कार्यकारी विश्वस्त श्रद्धा मोरे उपस्थित राहणार आहेत.ठाणे शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अवकाश केंद्र भेट प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सचिन मोरे यांनी दिली.