‘हॅरी पॉटर’ फेम ऑस्कर पुरस्कार विजेती अभिनेत्री मॅगी स्मिथ यांचं निधन

    28-Sep-2024
Total Views |
 
maggie smith
 
 
 
मुंबई : हॅरी पॉटर फेम हॉलिवूड अभिनेत्री मॅगी स्मिथ यांचं आज २८ सप्टेंबर २०२४ रोजी पहाटे निधन झाले. त्यांना दि प्राईम ऑफ मिस जीन ब्रॉडी आणि कॅलिफोर्निया सूट या दोन चित्रपटांसाठी ऑस्कर मिळाला होता. तसेच, २१ व्या शतकात डाऊनटन अॅबमे मधील ग्रँथमच्या डोजर काउंटेस आणि हॅरी पॉटरमधील प्रोफेसर मिनर्व्हा मॅकगोनागलची त्यांनी भूमिका साकारली होती. वयाच्या ८९ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
मॅगी यांच्या निधनाची बातमी ख्रिस लार्किन आणि टोबी स्टीफन्स या त्यांच्या मुलांनी दिली. लंडनच्या रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. मॅगी स्मिथ यांच्या पश्चात दोन मुले आणि पाच नातवंडे असा परिवार असून स्मिथ या प्रसिद्ध ब्रिटिश महिला कलाकार होत्या.
 
 
 
मॅगी स्मिथ यांचा जन्म १९३४ साली झाला. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात प्लेहाऊस थिएटरमधून केली होती. १९७० मध्ये ‘द प्राइम ऑफ मिस जीन ब्रॉडी’साठी आणि दुसरा १९७९ मध्ये ‘कॅलिफोर्निया सूट’साठी त्यांना ऑस्कर मिळाला होता.