अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल!

28 Sep 2024 13:39:03
 
Akshay Shinde
 
मुंबई : एकीकडे बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या अंत्यस्कारासाठी जागा उपलब्ध होत नाही. तर दुसरीकडे, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. मुंबईतील एका वकिलाने ही याचिका दाखल केली आहे.
 
दिनांक २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला होता. परंतू, यावरून सध्या अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. आपल्या मुलाची हत्या केली असल्याचा आरोप अक्षय शिंदेच्या आईवडीलांनी केला आहे. दरम्यान, अक्षयच्या मृत्यूला एवढे दिवस होऊनही त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अद्याप जागा मिळाली नाही.
 
हे वाचलंत का? -  ‘पत्राचाळीचा लुटारू राऊत‘ या चित्रपटाची पटकथा कशी वाटेल? प्रविण दरेकरांचा राऊतांना सवाल
 
त्यानंतर आता अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील वकील घनश्याम उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायामुर्तींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात यावी. तसेच जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0