पुणे : ज्ञानयात्रा आणि इंडिकल्ट हेरीटेज फाऊंडेशन यांच्या तर्फे नवरात्रीनिमित्त ‘जगज्जननि नमोsस्तु ते’ या व्याखानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ३ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत रोज रात्री ८:३० वाजता ऑनलाइन पद्धतीने ही व्याख्यानमाला होणार आहे. ३ ऑक्टोबर रोजी प्रणव गोखले यांचे ‘श्रीदेव्यथर्वशीर्षम’, ४ ऑक्टोबर रोजी डॉ. मंजूषा गोखले यांचे ‘पृथ्वीसूक्तम् – भूमातेचा उदो उदो’, ५ ऑक्टोबर रोजी डॉ. भाग्यलता पाटसकर यांचे कलौ सर्वेष्टसाधनम्, ६ ऑक्टोबर रोजी डॉ.भाग्यश्री पाटसकर यांचे ‘राज्यवर्धिनी: प्राचीन भारतीय नाण्यांवरील देवी प्रतिमा’, ७ ऑक्टोबर रोजी डॉ. सुचेता परांजपे यांचे ‘ऋग्वेदातील स्त्री देवता’, ८ ऑक्टोबर रोजी डॉ. अंबरीष खरे यांचे ‘दश महाविद्या’, ९ ऑक्टोबर रोजी डॉ. रमा गोळवळकर यांचे ‘देवी आरत्यांचे रसग्रहण, १० ऑक्टोबर रोजी डॉ. मंगला मिरासदार यांचे ‘मंत्रपुष्पम्’ आणि ११ ऑक्टोबर रोजी डॉ. गौरी मोघे यांचे ‘असुरसंहरिणी’ व्याखान होणार आहे. या व्याख्यानमालेत सहभागी होण्यासाठी ९१५६४३६९९६ या क्रमांकावर संपर्क साधावा.