अवैध मशीद बांधकामाविरोधात हिंदू आक्रमक, प्रशासनाला दिला १० दिवसांचा अल्टिमेट
27-Sep-2024
Total Views |
भोपाल : मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राँझी येथे गायत्री बाल मंदिरासाठी आरक्षित असलेल्या जागी अवैध मशिदीचे बांधकाम केल्याचा आरोप हिंदूंनी केला आहे. यानंतर आता विश्व हिंदू परिषद आणि बरजंग दल या हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन मशीदीला विरोध दर्शवला आहे. ही मशीद लवकरात लवकर पाडावी असा अल्टिमेट दिला आहे. ही घटना २६ सप्टेंबर रोजी घडली आहे.
प्रसारमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, राँझी येथे गायत्री बाल मंदिराठिकाणी मशिदीचे बांधकाम केले होते. आता ती मशीद येत्या १० दिवसांमध्ये पाडावी अशी मागणी हिंदू विश्व परिषदेने केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मशीद पाडण्याची मागणी केली जात आहे. जर ही मशीद हटवली नाहीतर येत्या १० दिवसांमध्ये आम्ही मशीद पाडू असे त्यांनी सांगितले होते.
मशीद पाडण्यासाठी २०२१ पासून हिंदूंनी मशिदीला विरोध केला. १२ जून २०२१ रोजी मशीद बेकायदेशीर बांधण्यात आली असे सांगितले. त्यावेळी कागदपत्रांचा हवाला देऊन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले होते. यानंतर २७ जुलै २०२१ रोजी मोठे प्रदर्शन झाले. मात्र त्यानंतर प्रशासनाने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. यामुळे मशीदीचे बांधकाम सुरू राहिले.
यावेळी उपविभागीय दंडाधिकारी ऋषभ जैन यांनी मशिदीच्या बांधकामावर बंदी घातली होती. परंतु असे असतानाही मशिदीचे बांधकाम छुप्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. बाहेरून लोकं येऊन मशिदीत राहतात. यामुळे याठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचू शकते. यावेळी हिंदू संघटनांनी रोहिंगे आणि असंख्य कट्टरपंथीयांच्या घुसखोरीमुळे गुन्हेगारी निर्माण झाली असल्याचा दावा केला आहे.