'स्त्री' २ ची ४३ दिवसांनंतरही जादू कायम, बॉक्स ऑफिसवर कमाईचा नवा रेकॉर्ड

27 Sep 2024 16:24:22
stree 2  
 
 
मुंबई : राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या स्त्री २ या हॉर-कॉमेडी चित्रपटाची जादू प्रदर्शनाच्या एक महिन्यानंतरही कायम आहे. दररोज बॉक्स ऑफिसवर स्त्री २ चित्रपट नवे इतिहास रचताना दिसत आहे. स्त्री २ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला असून चित्रपटाने जगभरातही भरपूर कमाई केली आहे.
'स्त्री २' चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल ४३ दिवस झाले असले तरी बॉक्स ऑफिसवर कमाईची गाडी थांबतच नाही आहे. विशेष म्हणजे स्त्री २ हा चित्रपट केवळ या वर्षातीलच सर्वात मोठा हिट ठरला नसून हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही ठरला आहे.
 
तरण आदर्शने दिलेल्या आकडेवारीनुसार, 'स्त्री 2' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ३०७.८० कोटी, दुसऱ्या आठवड्यात १४५.८० कोटी, तिसऱ्या आठवड्यात ७२.८३ कोटी, चौथ्या आठवड्यात ३७.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पाचव्या आठवड्यात २५.७२ कोटी रुपयांचे कलेक्शन झाले. चित्रपटाने सहाव्या शुक्रवारी ५.२० कोटी, सहाव्या शनिवारी ३.८० कोटी, सहाव्या रविवारी ५.३२ कोटी, सहाव्या सोमवारी १.५० कोटी, सहाव्या मंगळवारी १.३५ कोटी आणि सहाव्या बुधवारी १.३० कोटींचा व्यवसाय केला. त्यानंतर या चित्रपटाचे एकूण ४२ दिवसांचे कलेक्शन ६०८.३७ कोटी इतके झाले आहे.
 
तर, Saknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'स्त्री २' ने रिलीजनंतर सहाव्या गुरुवारी म्हणजेच रिलीजच्या ४३ व्या दिवशी १.०५ कोटींची कमाई केली असून ही कमाई ६०९.४२ इतकी झाली आहे.‘स्त्री २’ चित्रपटात राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0